कृषी महाविद्यालय, सरळगाव येथे २०२४ करिअर मार्गदर्शन सेमिनार चे यशस्वी आयोजन
कृषी महाविद्यालय, सरळगाव येथे २०२४ करिअर मार्गदर्शन सेमिनार चे यशस्वी आयोजन
बुधवार दिनांक १० जुलै २०२४
कृषी महाविद्यालय, सरळगाव येथे, श्री चैतन्य ईश करिअर अकॅडमी, मुरबाड च्या संयुक्त विद्यमाने “२०२४ करिअर मार्गदर्शन” सेमिनार चे आयोजन करण्यात आले. या सेमिनार ला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात UPSC प्रोफेसर श्री. कपिल लांडगे सरांनी मार्गदर्शन केले. यावेळी समिती सदस्य श्री. शिवाजी केदार, श्री. मनीष भोईर, श्री. तातु केदार, श्री. सुधीर बेलवले आणि कृषी महाविद्यालय, सरळगाव चे प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सेमिनार ला १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
या सेमिनारमध्ये खालील विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले
सरकारी नोकरीच्या संधी,
MPSC व UPSC चे महत्व,
Staff Selection च्या तयारीचे मार्गदर्शन,
स्पर्धा परीक्षां द्वारे मिळणारी पदे. इत्यादी.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रातील संधी आणि तयारीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
श्री चैतन्य ईश करिअर अकॅडमी, मुरबाड ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी व शासकीय परीक्षांची तयारी करण्यासाठी वचनबद्ध आहे. अकॅडमी मध्ये UPSC, MPSC, Staff Selection, आणि संरक्षण क्षेत्रातील तयारीसाठी विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. अकॅडमी मध्ये, अनुभवी प्राध्यापक मंडळ मुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळते.
अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण सुविधा, अद्ययावत ग्रंथालय, AC हॉल, २४ तास खुले असलेले अध्ययन केंद्र, ऑनलाईन व ऑफलाईन शिकवणी, आणि दररोजच्या व्याख्यानांची रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीसाठी सर्व सुविधा मिळू शकतात.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी तज्ञ व यशस्वी अधिकरींचे मार्गदर्शन मिळते. परीक्षा, मुलाखत द्वारे अनुभव दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविला जातो.
अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी Website वर भेट द्यावीत www.scica.in
तसेच, अकॅडमी ला प्रत्यक्ष भेट द्यावीत.
श्री कॉम्प्लेक्स, LIC ऑफिस च्या वर, पहिला मजला, म्हसा रोड, मुरबाड.
Mobile: +91 8928240798
Mail: info@scica.in